नाशिक: शुभांगी पाटील पाटील यांच्या हस्ते ज्योतिषरत्न सुनंदा शहाणे यांचा गौरव | पुढारी

नाशिक: शुभांगी पाटील पाटील यांच्या हस्ते ज्योतिषरत्न सुनंदा शहाणे यांचा गौरव

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेच्या दिवंगत नेत्या सत्यभामा गाडेकर यांना अभिप्रेत असलेले कार्य त्याचे कुटूंबीय करीत असल्याने त्यांच्या पाठीशी नागरीक सैदव राहतील असे मनोगत माजी मंत्री, उपनेते बबनराव घोलप यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनानिमित्ताने देवळाली गाव शिवसेना व युवा नेते योगेश गाडेकर यांच्या वतीने श्री दंडया मारुती मंदिर, शनि चौक देवळाली गाव या ठिकाणी प्रसिद्ध महिला कीर्तनकार हभप शीतल साबळे पाटील यांचे कीर्तन तसेच विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना “सौ सत्यभामा लक्ष्मण गाडेकर स्त्रीशक्ती गौरव पुरस्कार २०२३” देवून गौरवण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख शुभांगी पाटील यांनी स्व.गाडेकर यांनी काम केलेल्या पदाला न्याय दिला. त्या माध्यमातून अनेकांच्या अडचणी सोडवल्यामुळे त्या पदावर काम करतांना ऊर्जा मिळते.  आयोजक योगेश गाडेकर यांनी प्रास्ताविकेत सांगतिले की, देवळालीतील गावकऱ्यांनी गाडेकर परिवारावर नितांत प्रेम केले आहे. मातोश्री दिवंगत सत्यभामा गाडेकर यांचे निधन झाल्यानंतर त्याच तळमळीने महिलांसाठी कार्यक्रम, उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील असतो. कारण येथील प्रत्येक महिलांमध्ये आमच्या आईचे दर्शन होत असल्याचे भावनिक उदगार काढले, यावेळी उपस्थितांचे डोळ्याच्या कड्या पणावल्या होत्या.

माजी आमदार योगेश घोलप, अवघडपीर विजयनाथ महाराज, माजी नगरसेवक प्रशांत दिवे आदींची यावेळी उपस्थिती होते. मान्यवरांच्या हस्ते कमल पगारे, डॉ. मीना कनोजिया, दिपाली पुरोहित, वैष्णवी भांड, आशा मुठाळ, ॲड मनीषा शितोळे, ॲड चैत्राली देशमुख, रिना शिवदे, ताराबाई चौधरी, डॉ. ममता सुराणा, सुलोचना हिरे, नंदा शिरसाट, संगीता लाड, उज्वला जैन, सीमा जगताप पाटील, मनीषा तनपुरे, सुनंदा शहाणे, वंदना पंचारिया, हज्जन सय्यद जुलेखा नियाज, सुरेखा साळुंखे, ज्योती मानेकर, पुष्पा धाडीवाल, हिरकणी गांगुर्डे, सुनीता मुठाळ, जयश्री बैरागी, संगीताताई हिंगमिरे, यामिनी मोरे, संध्याताई तेली, ज्योती नेहे, कल्पना खरे, प्रतीक्षा ननावरे, पद्मा झोले, सौ रिना साळवे, छाया जगताप, सौ मीना आहेर, अनिता माळवे, रेखा आल्हाट, शारदाताई सपकाळ, आशाताई औटे, संस्कृती सोनवणे, ऋत्विका महानुभव, काकड ताई, यांचा सन्मान करण्यात आला.

रितू गाडेकर, सोनाली राऊत यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री गाडेकर, पल्लवी गाडेकर, विशाल गाडेकर यांनी मान्यवरांचा सत्कार केला, कार्यक्रमास महिला आघाडीच्या मंगला भास्कर, शोभा गटकळ, नयना घोलप, योगिता देशमुख, श्रद्धा दुसाने, गायत्री पगार, संगिता काळोखे, सुनिता कोठुळे, मंगल आढाव, मंदा गवळी, सरस्वती भालेराव, पद्मा थोरात तसेच देवळाली गाव पंच कमिटी बाळनाथ सरोदे, प्रदीप देशमुख, सुधाकर जाधव, महेश देशमुख, दगुजी खोले, कैलास चव्हाण, चंद्रकांत विसपुते, कैलास मोरे, विकास बोराडे, राजेंद्र शिंदे, संतोष साळवे, जगदीश पवार, सुनिल गोडसे, विकास गीते, त्र्यंबक दादा गायकवाड, नामदेवराव गाढवे पाटील, भास्कर शिरसाठ, उत्तम मामा कोठुळे, विजय भागवत, नितीन चिडे, किरण डहाळे, विक्रांत थोरात, योगेश नागरे, योगेश देशमुख, प्रशांत जाधव, स्वप्निल आवटे, राजुमामा गायधनी, वैभव वाळेकर, चंदू महानुभव, सागर कोकणे, रमेश जाधव सर, अतुल गवळी, आत्माराम आढाव, संजय कोठुळे, अन्सार शेख, राहुल चटोले, बंटी सोदे, पप्पू सय्यद, राजु कोटमे, संतोष महाले, दिनेश हांडोरे, कुमार पगारे, सोपान हांडोरे, गोरख व्यवहारे, शंकर साडे, रवी चौधरी, मंगेश लांडगे, संदीप आहेर, हेमंत चौधरी, प्रथमेश झुटे, स्वप्निल शहाणे, कुणाल शहाणे, प्रमोद शिंदे, उमेश गायकवाड, बापू कडबाने, अमर सरवय्या, आदि पंचक्रोशीतील महिला, नागरिक, देवळालीगांव, विहितगाव भजनी मंडळ उपस्थित होते आयोजक योगेश सत्यभामा-लक्ष्मण गाडेकर, देवळाली गाव शिवसेना, देवळाली गाव पंच कमिटी व स्व. सत्यभामा गाडेकर प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

हेही वाचा:

Back to top button