नाशिक : दोन महिलांनी लांबविली ३२ हजारांची रोकड | पुढारी

नाशिक : दोन महिलांनी लांबविली ३२ हजारांची रोकड

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

स्टेट बँकेत कामानिमित्त आलेल्या एका व्यक्तीच्या मुलीच्या पर्समध्ये असलेली ३२ हजार रुपयांची रोकड अज्ञात दोन महिलांनी लंपास केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण दत्तात्रय शिरोडे (५१, रा. फ्लॅट नंबर ३, वृंदावन हाइट्स, राणेनगर, नाशिक) हे त्यांच्या मुलीसोबत लेखानगर येथे असलेल्या स्टेट बँकेत कामानिमित्ताने गेले होते. दरम्यान, ते येथे असलेल्या खुर्चीवर बसले असता त्यांच्या मुलीच्या सॅकमध्ये ३२ हजार रुपयांची रोख रक्कम ठेवलेली होती. यावेळी या ठिकाणी असलेल्या दोन अनोळखी महिलांनी सॅक उघडून त्यातील ३२ हजार रुपयांची रोकड लांबवली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार हरुण शेख करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button