नाशिक : मनपातर्फे पुष्पोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन | पुढारी

नाशिक : मनपातर्फे पुष्पोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेमार्फत दि. २४ ते २६ मार्च या कालावधीमध्ये आयोजित पुष्पोत्सव २०२३ अंतर्गत नाशिककरांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

हा पुष्पोत्सव राजीव गांधी भवनाच्या प्रांगणात भरविण्यात येणार आहे. पुष्पोत्सवात विविध प्रकारची गुलाब पुष्पे, हंगामी फुले, पुष्परचना, मिनिएचर गार्डन, बोन्साय, कॅक्टस, फळे, भाजीपाला यांचे स्पर्धात्मक प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे. यात एकूण ५७ गट असून प्रत्येक गटासाठी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. महत्त्वाची बक्षिसे नामांकित कंपन्या, उद्योजक, सहकारी बँका, हॉटेल्स, व्यापारी समूहाकडून पुरस्कृत आहेत. स्पर्धेत गट अ मध्ये गुलाब पुष्प (खुल्या वातावरणात वाढलेले). गट ब मध्ये गुलाब पुष्प (कृत्रिम आच्छादनाखाली वाढलेले), गट क करिता गुलाब पुष्प (खुला गट), गट ड मध्ये मोसमी व बहुवर्षीय फुले, गट इ मध्ये कुंडीतील शोभा वनस्पती, गट फ करिता पुष्परचना, गट जी साठी फळे व भाजीपाला, गट एच- कुंड्यांची सजावट आणि परिसर प्रतिकृती आणि गट आय मध्ये खुल्या जागेतील स्टॉलची सुबक रचना अशा विविध गटांमध्ये स्पर्धा ठेवली आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी उद्यान निरीक्षक उद्धव मोगल यांच्याशी ९५७९५७५४०४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उद्यान विभागामार्फत केले आहे.

दि. २४ मार्च रोजी पुष्पोत्सवाचे उद्घाटन व ट्रॉफी वितरण समारंभ होणार होईल. त्यानंतर २५ व २६ मार्च रोजी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत पुष्पप्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले राहील. कार्यक्रमाच्या प्रांगणात संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button