नगर : राहुरीतील त्या रस्त्याचे भाग्य उजाळणार : आ. तनपुरे | पुढारी

नगर : राहुरीतील त्या रस्त्याचे भाग्य उजाळणार : आ. तनपुरे

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी मतदार संघातील प्रलंबित प्रश्न सोडविताना पाणी योजनांसह रस्त्याचे प्रश्न प्रामुख्याने सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 अंतर्गत विविध गावांतील रस्त्यांसाठी शासनाकडून 34 कोटी 72 लक्ष 51 हजार रूपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. कार्यारंभ आदेश लवकरच प्राप्त होऊन रस्त्याची समस्या संपुष्टात येणार असल्याची माहिती आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिली. राज्यात मान्सून हंगामात अतिवृष्टीने अनेक ररस्त्यांची दैना झाली. ग्रामीण भागाला जोडणारे रस्त्यांना निधी मिळावा म्हणून राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे. अनेक गावातील रस्त्यांसाठी राज्यात महाविकास आघाडी शासन असताना कोट्यवधी रूपयांचा निधी आणला. सत्तांतर झाल्यानंतर मंत्रीपद गेले. तरीही लोकप्रतिनिधी म्हणून राज्य शासनाकडे केलेला पाठपुरावा महत्वाचा ठरत असल्याचे आ. तनपुरे यांनी सांगितले.

राहुरी मतदार संघातील महत्वाच्या गावांना जोडणारे रस्ते सुस्थितीत असावे हा हेतू साध्य होण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 अंतर्गत रस्ता कामासाठी निधी मंजूर झाला आहे. प्रशासकीय मंजूरी मिळाल्यानंतर लवकरच रस्ता कामांना शुभारंभ होण्यासाठी कार्यारंभ आदेश मिळणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 या योजनेतील राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघातील प्रशासकीय मंजूरी मिळालेली गावांचे रस्ते व निधी- राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी ते पिंप्री वळण रस्ता (9 कि.मी.) 3 कोटी 59 लाख 92 हजार, प्रजिमा 27 केंदळ खु. ते ब्राह्मणी रस्ता (5.200 कि.मी.) 3 कोटी 97 लाख 17 हजार, प्रजिमा 27 वाघाचा आखाडा टाकळीमिया ते लाख रस्ता (8.870 कि.मी.) 9 कोटी 77 लाख 20 हजार, वांबोरी ते धामोरी रस्ता (2.970 कि.मी.) 2 कोटी 81 लाख 53 हजार, रामा 160 ते गणेगाव रस्ता (2.500 कि.मी.) रक्कम 2 कोटी 32 लाख, सात्रळ डुक्रेवाडी -माळेवाडी ते कानडगाव रस्ता (5 कि.मी.) 5 कोटी 30 लाख 8 हजार, रामा 36 गडधे आखाडा ते ठाकरवाडी गाडकवाडी रस्ता (4.320 कि. मी.) 3 कोटी 84 लाख 43 हजार रुपये, वांबोरी ते शिंगवे रस्ता (3 कि.मी.) 3 कोटी 1 लाख 18 हजार रुपये असे एकूण 34 कोटी 72 लक्ष 51 हजार रूपयांच्या कामांना 8 मार्च रोजी प्रशासकीय मंजूरी मिळाल्याचे आ. तनपुरे यांनी सांगितले.

Back to top button