नाशिक : सिडको ब्लॉक काँग्रेसतर्फे पर्दाफाश आंदोलन | पुढारी

नाशिक : सिडको ब्लॉक काँग्रेसतर्फे पर्दाफाश आंदोलन

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अदानी समूहाने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या हजारो कोटी रुपयांच्या कर्जावर आणि अदानी समुहाच्या शेअर ढासललेल्या परिस्थितीवर भाजप प्रणित केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण दिले जात नाही. सर्वसामान्यांचा पैसा धोक्यात आला असा आरोप करीत अदानी समुहाच्या महाघोटाळ्याविरोधात गुरूवारी (दि.९) सिडको ब्लॉक काँग्रेसतर्फे पर्दाफाश आंदोलन करण्यात आले.

देश वाचवण्यासाठी सरकारचे आर्थिक धोरण बदलणे गरजेचे आहे असे अशी भूमिका नवनियुक्त शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी मांडली. तर केंद्र सरकारचे देश बर्बाद करण्याचे धोरण सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी पर्दाफाश आंदोलन महत्त्वाची भुमिका पार पाडेल, असा विश्वास माजी नगरसेवक अण्णा पाटील यांनी व्यक्त केला. आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीकरत संपुर्ण परिसर दणाणू सोडला. आंदोलनात माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, आशा तडवी, वत्सला खैरे, समिना पठाण, नाना भामरे, स्वप्नील पाटील, जायभावे, नंदकुमार कर्डक, धोंडीराम बोडके, धोंडीराम आव्हाड, हनिब बशीर, सुभाष पाटील, प्रिया ठाकूर, सझिया शेख, सोफिया सिद्धीकी, दर्शन पाटील, नितेश निकम, मनोज साठे, सनी सूर्यवंशी, इसाक कुरेशी, अनिल बहोत, देवराम सैदाणे, सुरज चव्हाण आदी उपस्थित होते. आंदोलनाचे नियोजन ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील, भरत पाटील, गौरव सोनार अशोक लहामगे, चारुशीला शिरोडे, इम्रान अन्सारी, देवेंद्र देशपांडे आदींनी केले होते.

हेही वाचा :

Back to top button