नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात | पुढारी

नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून चारजण जागीच ठार झाले तर एक गंभीर आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार, दि. 8 रोजी दुपारी चारच्या सुमारास पंढरपुरवाडी समोर नाशिकहून मुंबईकडे जाणारी एसेंट चारचाकी (एम. एच. 04 एफ. ए. 8291) भरगाव जात असतांना अचानक वाहनाचा पुढील टायर फुटला. यावेळी मुंबईहून नाशिककडे येणारी अपघातग्रस्त वॅगनर वाहन घेऊन जाणाऱ्या टोइंग व्हॅनवर फुटलेल्या टायरचे वाहन जम्प करुन धडकले. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील एक मुलगी, एक  महिला व दोन पुरुष जागेवर ठार झाल्याची घटना घडली आहे.

हेही वाचा:

Back to top button