महिला दिन विशेष : शिक्षिकेची नाशिकपासून स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत सायकलवारी | पुढारी

महिला दिन विशेष : शिक्षिकेची नाशिकपासून स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत सायकलवारी

नाशिक : नितीन रणशूर

आदिवासी आश्रमशाळेच्या प्राथमिक शिक्षिका अमृता भालेराव यांनी नाशिक ते गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी अशी सायकलवारी पूर्ण केली. भालेराव यांनी तीन दिवसांत ३५० किलोमीटरचे अंतर कपात करून जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जगातील सर्वांत उंच पुतळा (उंची 597 फूट) असलेल्या लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केले. त्यांना सायकल प्रवासात लहरी हवामानाचा सामना करावा लागला.

अमृता भालेराव या आदिवासी विकास विभागाच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भिलमाळ येथे शासकीय आश्रमशाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असून, सध्या शैक्षणिक गुणवत्ता कक्षाच्या शैक्षणिक समन्वयक म्हणून काम बघतात. जागतिक महिला दिनाच्या दिवशी अनेक पारंपरिक उपक्रम महिलांसाठी होतात. मात्र, या सर्व बाबींना फाटा देऊन त्यांनी नाशिक ते स्टॅच्यू ऑफ युनिटी असा 350 किलोमीटरची सायकलवारीचा संकल्प केला होता.

आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, अपर आयुक्त (मुख्यालय) तुषार माळी आणि उपआयुक्त अविनाश चव्हाण यांच्या शुभेच्छांसह शनिवारी (दि. ४) सकाळी 5.30 वाजता भालेराव नाशिकहून सायकलने गुजरातच्या दिशेने रवाना झाल्या. त्यांनी पहिल्या दिवशी सापुतारा (100 किलोमीटर), दुसऱ्या दिवशी मांडवी (137 किलोमीटर) आणि तिसऱ्या दिवशी स्टॅच्यू ऑफ युनिटी असा सायकल प्रवास केला. साेमवारी (दि. ६) रात्री वातावरण खराब झाले होते. प्रचंड वादळ आणि विजेच्या कडकडाटासह पावसात शेवटचे 20 किलोमीटर अंतर त्यांनी पूर्ण केले.

हेही वाचा : 

Back to top button