पिंपळनेर : पालकमंत्र्यांसह खासदार, आमदार शेतक-यांच्या बांधावर; लवकरच मदत मिळेल : गिरीश महाजन | पुढारी

पिंपळनेर : पालकमंत्र्यांसह खासदार, आमदार शेतक-यांच्या बांधावर; लवकरच मदत मिळेल : गिरीश महाजन

पिंपळनेर:(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेरसह परिसरातील दहिवेल, निजामपूर, जैताने, खोरी, टिटाणे, पेटले, शनिमांडळ, खोरी, जामदे, ऐचाळे आदी भागात शनिवार, दि. ४ च्या सुमारास झालेला अवकाळी पाऊस व गारपिटाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसानीची पाहणी करण्यासाठी टिटाणे व खोरी परिसरात पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हिना गावित, खासदार सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, आमदार जयकुमार रावळ, आमदार मंजुळा गावित, प्रांताधिकारी तृप्ती घोडमिसे, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, तालुका कृषी अधिकारी सी.के.ठाकरे, तहसिलदार चव्हाण.के, मुख्य कार्यकारी अधिकारी, साक्री विधानसभा प्रमुख इंजी. मोहन सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा चिटणीस के.टी.सूर्यवंशी, प्रशासनातील अधिकारी आणि कृषी विभागाचे अधिकारी यांनी मंगळवारी, दि. 7 रोजी पाहणी दौरा केला. साक्री तालुक्यातील खोरी येथे गारपीट वादळी वा-याच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहाणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी मंत्री महोदयांकडे कैफियत मांडली. तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची मागणी केली. त्यानुसार पालकमंत्री महाजन यांनी जिल्हाधिकारी यांना नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार पंचनामा करण्याचे कामही सुरू झाले असून टिटाणे व खोरी परिसरातील शेतकरी बांधवांना लवकरात लवकर मदत मिळेल असे महाजन यांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

Back to top button