जळगाव : जुगार अड्यावर धाड; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

जळगाव : जुगार अड्यावर धाड; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रावेर तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्याच्या जवळील कार्यकर्त्याच्या जुगार अड्यावर ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने सोमवार (दि. ६) पहाटे ४.२० च्या सुमारास रावेर तालुक्यात कारवाई केली. मोरगाव (ता.रावेर) येथील प्रल्हाद पुंडलीक पाटील हा घराच्या वॉल कंम्पाऊंडमध्ये झन्ना मन्ना नावाचा पत्ता जुगाराचा खेळ खेळत खेळवित होता. याठिकाणी पोलिसांनी कारवाई करुन पत्ता जुगाराची साधने, रोख रुपये १ लाख ४६ हजार ९४०रुपये, ८ चारचाकी वाहने, ६ मोटारसायकल सह एकूण ५५ लाख ४६ हजार ९४० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तर पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, सफौ रवि नरवाडे, सफौ युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ कमलाकर बागुल, महेश महाजन, पोना. संतोष मायकल, पोना किरण धनगर, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोहेकॉ भारत पाटील, प्रमोद ठाकुर यांच्या पथकाने ही कारवाई फत्ते केली.

यांना झाली अटक…
पोलिसांनी जुगार अड्ड्डा मालक संदिप दिनकरराव देशमुख (४८ रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर), संजय दर्शन गुप्ता (५०, रा. लालबाग बऱ्हाणपुर (म.प्र.), शांताराम जिवराम मंगळकर (४७, रा. लालबाग बऱ्हाणपुर (म.प्र.), समाधान काशिनाथ कोळी (वय ३०, रा.सांगवा ता. रावेर), कासम महेबुब तडवी (२८, रा. पिंप्री ता. रावेर), जितेंद्र सुभाष पाटील (३५, रा. विवरा ता. रावेर), कैलास नारायण भोई (वय २३ रा. भोईवाडा, रावेर), मनोज दत्तु पाटील (४८, रा. पिंप्रीनादु ता. मुक्ताईनगर), मनोज अनाराम सोळंखे (३४ रा. आलमगंज बऱ्हाणपूर (म.प्र.), सुधिर गोपालदास तुलसानी (४७, रा. इद्रनगर, बऱ्हाणपूर (म.प्र.), रविंद्र काशिनाथ महाजन (५४ रा. वाघोदा ता. रावेर), बापु मका ठेलारी (३१, रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर), राजु सुकदेव काळे (५४ रा. प्रतापपुरा बन्हाणपूर (म.प्र.), युवराज चिंधु ठाकरे (६५ रा. महालक्ष्मी मंदिरा जवळ रावेर), सोपान एकनाथ महाजन (५९ रा. डापोरा अडगाव ता. ब-हाणपूर (म.प्र.), छोट्या (पूर्ण नाव माहित नाही), प्रल्हाद पुंडलीक पाटील रा. मोरगाव ता. रावेर (जागा मालक) यांना पोलिसांनी अटक केली.
हेही वाचा:

 

Back to top button