पिंपळनेरच्या महाविद्यालयात ‘त्या’ दिवसाची कार्यशाळा | पुढारी

पिंपळनेरच्या महाविद्यालयात 'त्या' दिवसाची कार्यशाळा

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
येथील कर्म. आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै.अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी विकास व प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मासिक पाळी, स्वच्छता व संवर्धन’ या विषयांवर कार्यशाळा घेण्यात आली.

कार्यशाळेच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य के. डी. कदम तर जळगाव येथील मुकेश चव्हाण हे प्रमुख मार्गदर्शक होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रोफे.डॉ. डब्ल्यू.बी. शिरसाठ, प्रोफे.डॉ.बी.सी. मोरे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय खोडके, योगशिक्षक प्रा. डॉ. वाय. एम. नांद्रे हे उपस्थित होते. प्रा. चव्हाण मार्गदर्शन करताना म्हणाले की, किशोरवयीन मुलींच्या शरीरात हार्मोन्समुळे अनेक बदल होत असतात. आजची युवती ही उद्याची माता आहे. त्यामुळे तिने मासिक पाळीच्या काळात आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. या काळात बॅक्टेरियल तसेच व्हायरल इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी यावर देखील त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगशिक्षक प्रा. डॉ. वाय. एम. नांद्रे यांनी केले. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजय खोडके यांनी सूत्रसंचालन केले.  कार्यशाळेस महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

हेही वाचा:

Back to top button