जळगाव : वाळूचे ट्रॅक्टर बैलगाडीला धडकले; दोन्ही बैल ठार, शेतकरी बचावला | पुढारी

जळगाव : वाळूचे ट्रॅक्टर बैलगाडीला धडकले; दोन्ही बैल ठार, शेतकरी बचावला

जळगाव : जळगाव ते कानळदा रोडवर असलेल्या एका शेतकर्‍याच्या उभ्या बैलगाडीला भरधाव वेगाने येणार्‍या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने २ बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी १० वाजता घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव कानळदा रोडच्या बाजूला असलेल्या लक्ष्मी जिनिंग जवळ दगडू राजाराम धनगर रा. आव्हाणे ता. जि. जळगाव यांचे शेत आहे. शुक्रवार ३ मार्च रोजी सकाळी १० वाजता दगडू धनगर हे मुलगा रावसाहेब धनगर यांच्यासोबत शेतातील पिकांना खत देण्यासाठी बैलगाडीने रासायनिक खते घेऊन शेतात गेले. त्यावेळी त्यांनी शेताच्या बाजूला असलेल्या रोडवर बैलगाडी उभी करून रासायनिक खते शेतात डोक्यावरून नेत होते. दरम्यान रोडवर उभी असलेली बैलगाडीला जळगावकडून गिरणा नदीत जाणार्‍या भरधाव वाळूच्या रिकाम्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली.

WTC Final : इंदूर कसोटी हरल्यानंतरही भारताला WTC फायनल खेळण्याची संधी, जाणून घ्या समीकरण

थोडक्यात बचावला शेतकरी….
या धडकेत दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला तर बैलगाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ट्रॅक्टर देखील पलटी होऊन बाजूला पडले. हा अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. सुदैवाने या ट्रॅक्टरजवळ शेतकरी दगडू धनगर व रावसाहेब धनगर नव्हते, अन्यथा त्यांनाही दुखापत होण्याची शक्यता होती.

अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार…

दरम्यान, अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर सोडून पसार झाला होता. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर रस्त्यावर असलेल्या वाहतुकीचा देखील बराच वेळ खोळंबा झाला होता.

हेही वाचा : 

Back to top button