नाशिक : उद्यापासून दहावीची परीक्षा; शैक्षणिक विभाग सज्ज | पुढारी

नाशिक : उद्यापासून दहावीची परीक्षा; शैक्षणिक विभाग सज्ज

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
राज्यात बारावीच्या परीक्षा सुरू असताना इयत्ता दहावी परीक्षेसदेखील 2 मार्चपासून सुरुवात होत आहे. यासाठी नांदगाव शैक्षणिक विभाग सज्ज झाला असून, परीक्षेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. नांदगाव आणि मनमाड मिळून तालुक्यातील एकूण 4,459 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

बारावीच्या परीक्षांप्रमाणेच दहावीच्या परीक्षेत परीक्षा केंद्रावर प्रविष्ट शाळांना वगळून तालुक्यातील अन्य शाळांमधील शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच कॉपीमुक्त परीक्षा धोरण राबविण्यात येणार आहे. नांदगाव आणि मनमाड मिळवून एकूण 11 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. पुढील शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने ही परीक्षा महत्त्वाची मानले जाते.

तालुक्यात दहावीची परीक्षा 11 केंद्रांवर होणार आहे. कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी महसूल विभागाची पथके तसेच इतर विभागाची भरारी पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर दक्षता समितीही स्थापन करण्यात आली आहे. – प्रमोद चिंचोले, गटशिक्षण अधिकारी, पं. स. नांदगाव.

* परीक्षा केंद्र – 11
* केंद्र संचालक – 11
* पर्यवेक्षक – 181
* परीक्षा देणारे विद्यार्थी …
* मनमाड –  1,688
* नांदगाव  – 2,771
* एकूण – 4,459

हेही वाचा:

Back to top button