धुळ्यातील कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या महिला पहिलवानांची बाजी | पुढारी

धुळ्यातील कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या महिला पहिलवानांची बाजी

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळ्याच्या गरुड मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय पै स्व खाशाबा जाधव स्मृती चषक स्पर्धेचा कालचा दिवस कोल्हापूरच्या महिला पहिलवानांनी गाजवला. कोल्हापूरला या पहिलवानांनी चार पदकांची लयलूट केली. त्या पाठोपाठ सांगलीने तीन, पुणे जिल्ह्याने दोन तर अहमदनगर,रायगड आणि धुळे जिल्ह्याने प्रत्येकी एक पदक मिळवले.

धुळ्यात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. यात काल सकाळपासूनच कोल्हापूरच्या महिला पहिलवानांनी आगेकूच सुरू ठेवली आहे. यात सायंकाळी उशिरा चार गटांमधून कोल्हापूर जिल्ह्याच्या संघाने तीन सुवर्णपदक आणि एक कांस्यपदक मिळवले आहे. महिलांच्या 50 किलो वजनी गटात कोल्हापूर जिल्ह्याच्या सुवर्णा नेहा चौगुले यांनी सुवर्ण, सांगलीच्या समृद्धी घोरपडेने रजत तर पुणे जिल्ह्याच्या स्मृती येवले यांनी कांस्यपदक मिळवले. 53 किलो वजन गटात कोल्हापूरच्या स्वाती शिंदेने सुवर्ण, पुणे जिल्ह्याच्या साक्षी इंगळे हिने रजत तर सांगलीच्या संस्कृतीमुळे हिने कांस्यपदक मिळवले आहे. 55 किलो वजन गटात कोल्हापूरच्या विश्रांती पाटीलने सुवर्ण, सांगलीच्या अंजली पाटीलने रजत तर धुळ्याच्या साक्षी शिंदे हिने कांस्यपदक मिळवले आहे. 57 किलो वजन गटांमध्ये अहमदनगरच्या सोनल मंडलिक हिने सुवर्ण, रायगडच्या रेणुका महाराजांनी रजत तर कोल्हापूरच्या तनुजा संकपाळ हिने कांस्यपदक मिळवले.

या निकालानुसार कोल्हापूरने तीन सुवर्ण, एक कांस्यपदक, सांगलीने दोन रजत आणि एक कांस्यपदक, पुणे जिल्ह्याने एक कांस्य आणि एक रजत तर अहमदनगर जिल्ह्याने एक सुवर्ण, रायगड जिल्ह्याने एक रजत तर धुळे जिल्ह्याने एक कांस्यपदक मिळवले. विजयी स्पर्धकांचे प्रेक्षकांनी जल्लोषात स्वागत केले.

हेही वाचा : 

Back to top button