जळगाव जिल्ह्यातील पोलीस निरिक्षकांच्या बदल्या

जळगाव : पोलीस अधिक्षक राजकुमार यांनी जिल्ह्यातील पोलीस निरिक्षकांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील पोलीस निरिक्षकांच्या बदल्या होणार असल्याची चर्चा सुरू होती. या अनुषंगाने पोलीस अधिकार्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.
जिल्ह्यात, नियंत्रण कक्षातील शिल्पा गोपीचंद पाटील यांच्याकडे रामानंद नगरचा कार्यभार आला आहे. नियंत्रण कक्षातील संदीप भटू पाटील यांची चाळीसगाव शहरला बदली झाली आहे. नियंत्रण कक्षातील कावेरी महादेव कमलाकर यांना चोपडा ग्रामीण पोलीस स्थानक मिळाले आहे. सध्या यावलचा प्रभार असणारे राकेश मानगावकर यांना यावल येथेच पोस्टींग मिळाली आहे. नियंत्रण कक्षातील रंगनाथ धारबळे यांना जि.वि.शा. जळगाव येथे पोस्टींग मिळाली आहे. नियंत्रण़ कक्षातील बबन मारूती आव्हाड यांना चाळीसगाव ग्रामीण मिळाले आहे. उध्दव डमाळे यांची धरणगाव पोलीस स्थानकात पोस्टींग झाली आहे. राजेंद्र प्रल्हाद पाटील यांना भडगाव पोलीस स्थानकाची धुरा मिळाली आहे. विजय शिंदे यांना अमळनेरची धुरा मिळाली आहे. सतीश गोराडे यांना एरंडोल पोलीस स्थानक मिळाले आहे. जयपाल हिरे यांना एमआयडीसी पोलीस स्टेशनचा कार्यभार मिळाला आहे. ज्ञानेश्वर जाधव यांना जिल्हापेठचा कार्यभार मिळाला आहे. अशोक उतेकर यांची भडगावहून सायबर पोलीस स्थानकात बदली झाली आहे. संजय ठेंगे यांची चाळीसगाव ग्रामीण वरून नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. मुक्ताईनगरचे शंकर शेळके यांची जळगाव शनिपेठ स्थानकात बदली झाली आहे. धरणगावचे राहूल खताळ यांची पाचोरा पोलीस स्थानकात बदली झाली आहे. कांतीलाल काशिनाथ पाटील यांची चाळीसगाव शहरवरून चोपडा शहर पोलीस स्थानकात बदली झालेली आहे.
नवीन नियुक्ती/बदली झालेल्या पोलीस निरिक्षकांनी तात्काळ विहित ठिकाणी जाऊन आपल्या पदांचा कार्यभार सांभाळावा असे निर्देश अधिक्षक एम. राजकुमार यांनी दिले आहेत.
हेही वाचा :
- पुणे : ‘भावी मुख्यमंत्री’ पोस्टर लावणाऱ्याला शोधून काढावे ; सुप्रिया सुळे यांची मागणी
- पाथर्डी तालुका : भाजपच्या उपोषणात राष्ट्रवादीची मध्यस्थी
- आ. राजन साळवी यांची ‘एसीबी’कडून पुन्हा चौकशी