जळगाव : जन्मदात्याचे पोटच्या मुलीवरच अत्याचार; मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा | पुढारी

जळगाव : जन्मदात्याचे पोटच्या मुलीवरच अत्याचार; मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
स्वत:च्या अल्पवयीन पीडितेवर बळजबरीने अत्याचार करण्यात आल्याची घटना पारोळा तालुक्यात २०२० मध्ये घडली होती. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांत संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर नराधम बापाला मरेपर्यंत जन्मठेप, तीन वर्षे सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली‎ आहे.‎
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून दि.१३ फेब्रुवारी २०२० रोजी पिडीतेची आई ही लग्नानिमित्ताने बाहेर गावी मुक्कामी गेले. पिडीता घरी एकटी असताना, रात्री ११ वाजता आरोपीने दारु पिऊन पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला. तसेच कुणाला सांगितल्यास मारून टाकण्याची व स्वतः मरून जाण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेनं पोलिसांत फिर्याद दिली, त्यानुसार आरोपी विरोधात विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश 1 एस.बी.गायधनी यांचेपुढे कामकाज चालले.
११ साक्षीदार तपासले
यामध्ये सरकारी वकील ॲड. किशोर आर. बागुल, मंगरूळकर यांनी एकुण ११ साक्षीदार तपासले. पैकी पिडीताची साक्ष तसेच सरकारी पंच व पिडीतेची आई व डॉ. विदयेश जैन, डॉ.सुप्रिया खांडे, डॉ. गणेश पाटील यांची साक्ष व तसेच न्यायवैदयानिक विभाग नाशिक यांचेकडील डि.एन.ए व रक्त तपासणी अहवाल महत्वाचे ठरले. तपासी अधिकारी रविंद्र बागुल यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपीस सदरचा खटल्या कामी आलेल्या पुराव्या वरून गुन्हा सिध्द झालेने बाललैंगिक आत्याचार कलमनुसार मरेपर्यन्त आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या कामी पैरवी अधिकारी उदयसिंग सांळुके व पो.कॉ. हिरालाल पाटील, अमळनेर यांनी काम पाहीले. सहा. सरकारी वकील के आर बागुल यांनी कळविले आहे.

हेही वाचा:

Back to top button