पुणे : दोन कोटींच्या 21 यंत्रांची परस्पर विक्री ; एकावर गुन्हा | पुढारी

पुणे : दोन कोटींच्या 21 यंत्रांची परस्पर विक्री ; एकावर गुन्हा

चाकण : पुढारी वृत्तसेवा :  शेडमध्ये ठेवलेल्या सुमारे दोन कोटी रुपयांच्या 21 मशीन मालकाच्या परस्पर विकून विश्वासघात केल्याचा प्रकार समोर आला आहे. खेड तालुक्यातील खराबवाडी येथे टच ईलॅस्टिक्स या कंपनीत हा प्रकार घडला आहे. प्रसनजीत शीतलचंद्र दास (वय 48, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश संभाजी माळी (रा. शिवाजीनगर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दास यांनी त्यांच्या कंपनीतील सुमारे दोन कोटी रुपयांच्या 21 मशीन गणेश माळी याच्या शेडमध्ये ठेवल्या होत्या. काही दिवसांनी दास हे त्यांच्या मशीन पाहण्यासाठी गेले असता त्यांच्या मशीन शेडच्या बाहेर ताडपत्रीने झाकलेल्या दिसल्या. त्यानंतर काही दिवसांनी दास मशीन पाहण्यासाठी गेले असता त्यांच्या मशीन शेडमध्ये अथवा परिसरात दिसल्या नाहीत. माळी याने दास यांच्या परस्पर सुमारे दोन कोटी रुपयांच्या 21 मशीन विकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button