Nashik : शिवसैनिकांनो जोमाने कामाला लागा : जिल्हाप्रमुख कुणाल दराडे | पुढारी

Nashik : शिवसैनिकांनो जोमाने कामाला लागा : जिल्हाप्रमुख कुणाल दराडे

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

सध्याचा काळ खऱ्याखुऱ्या शिवसेनेचा कसोटी काळ असला तरी कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असून, शिवसेनेची खरी ताकद दाखविण्यासाठी संघटन वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने कामास लागावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी केले.

उद्धव शिवसेना ठाकरे या पक्षाची बैठक निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथील शिवसेना कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप, पंचायत समितीचे माजी सभापती शिवा पाटील सुराशे, विंचूर शहरप्रमुख नानासाहेब जेऊघाले, ज्येष्ठ शिवसैनिक राजाभाऊ दरेकर, सुनील आब्बड, ज्ञानेश्वर तासकर हे उपस्थित होते.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता घराघरांत पुन्हा एकदा शिवसेनेचे नाव पोहोचण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, जास्तीत जास्त शाखानिर्मिती कराव्या, नुकताच आदित्य ठाकरे यांचा दौरा झालेला असल्याने युवा कार्यकर्त्यांमध्ये जोशपूर्ण वातावरण असून, त्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये घेता येईल, असे प्रतिपादन दराडे यांनी यावेळी व्यक्त केले.

कट्टर शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे शिवसेनेसोबत असून, निवडणुका लागल्यावरच आपली खरी ताकद दिसणार असल्याने शिवसैनिकांनी मरगळ झटकून कामास लागावे, असे आवाहन शिवा पाटील सुराशे यांनी केले.

याप्रसंगी माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर पवार, विकास रायते, विलास नागरे, संतोष पानगव्हाणे, विलास वाघ, अभिप्राय घोटेकर, केशव जाधव, प्रमोद पाटील, सचिन सोमवंशी, किरण शिंदे, केशव गारे, बाळासाहेब शिरसाट, भय्या काळे, सुमंत कारवाळ, नितीन जाधव यांच्यासह येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील ४६ गावांतील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button