नाशिक : अज्ञाताने विषारी औषध फवारून केले टोमॅटो उत्पादकाचे नुकसान | पुढारी

नाशिक : अज्ञाताने विषारी औषध फवारून केले टोमॅटो उत्पादकाचे नुकसान

नाशिक (चापडगाव) : पुढारी वृत्तसेवा
कोणीतरी अज्ञात विषारी औषध फवारणी करून वीस गुंठ्यातील टोमॅटो पिकाचे नुकसान केल्याची घटना दापूर शिवारात सोमवारी (दि.6) ते रविवारी (दि. 12) दरम्यान घडली आहे. तालुक्यातील दापूर शिवारात खंडेराव अवधूत आव्हाड यांनी आपल्या शेतात गट नंबर 426/1 मध्ये वीस गुंठे क्षेत्रात टोमॅटो पीक घेतले आहे. रविवारी (दि. 12) सकाळी 10 वाजेच्या सुमारास आव्हाड हे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शेतात काहीतरी विषारी औषध मारून टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान केले आहे. याबाबत खंडेराव आव्हाड यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक चव्हाणके पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button