नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
अजित पवार मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नावर खुद्द शरद पवार यांनीच उत्तर दिले आहे. अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे आहे, त्यासाठी कामाला लागा असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केले होते. त्याआधीपासून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली जात होती. यावर आता शरद पवार यांनीच स्पष्टीकरण देत या मुद्द्याला पूर्णविराम दिला आहे.
शरद पवार हे नाशिक दौ-यावर आहेत. यावेळी पत्रकारपरिषदेत विचारलेल्या प्रश्नाला शरद पवार यांनी तसे उत्तर दिले. अजित दादा मुख्यमंत्री व्हावे ही अनेकांची इच्छा असली तरी आमच्याकडे संख्या नाही, संख्या असती तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
तसेच यावेळी शऱद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांवरही निशाणा साधला. मोदी आणि अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौ-यावर बोलताना, त्यांना राज्यातील निवडणुका महत्वाच्या वाटत असाव्यात अशी खोचक टीका शरद पवारांनी केली आहे.
हेही वाचा :