Dhule Sakri : कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका, अग्निवीर गोरक्षकांची धाडसी कामगिरी | पुढारी

Dhule Sakri : कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका, अग्निवीर गोरक्षकांची धाडसी कामगिरी

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

दहिवेल नवापूर साक्री महामार्गावर पहाटे 5 वाजेच्या दरम्यान जिवंत गोवंश वाहतूक करणारी गाडी अग्निवीर हिंदू संघटनेच्या गोरक्षकांनी अडविली. या गाडीत 35 ते 40 गोवंश आढळून आले असून दहा चाकी ट्रकसह ड्रायवर व किन्नर दोघांना साक्री पोलिसांनी ताब्यात घेतले.

अग्निवीर हिंदू संघटन महाराष्ट्र राज्याच्या गोरक्षकांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही गोवंश वाहतूक रोखणे शक्य झाले. मालेगावच्या दिशेने कत्तलीसाठी जाणारे वाहन क्रमांक एम.एच.20 बिटी.7842 पोलिसांनी जप्त केले आहे.

ही कारवाई गोरक्षक प्राणी कल्याण अधिकारी यतीन जैन, ज्ञानेश्वर महाजन, संजयकाका शर्मा, भुरा भाऊ, मोहन शेवाळे, गुरु पाटील, मयूर कासार, पंकज वानखेडे, चेतन पगारे, चेतन शिंदे, पियुष कोठावदे, प्रसाद दशपुते, भरत जगताप, बंटी शिंदे, विशाल गवळे, शुभम वाघ, विक्की मुंडा, महेश सोनवणे, दादु ठाकरे, भूषण बाबा पाटील, बाबा गुरव यांच्या मदतीने करण्यात आली.  तसेच गोरक्षक विभाग मुंबई, पिंपळनेर, साक्री, दहीवेल, जायखेडा, धुळे, नादिन, ताहाराबाद, नंदुरबार येथील गोरक्षकांनी एकत्रित येवून पहाटे ही कार्यवाही केली असून कहाणी येथील नागेश्वर गोशाळेत गायींना पाठवण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button