नाशिक : सप्तशृंगींच्या दर्शनासाठी आता सशुल्क पास | पुढारी

नाशिक : सप्तशृंगींच्या दर्शनासाठी आता सशुल्क पास

नाशिक (सप्तशुंगगड) : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या श्री सप्तश्रृंग देवी दर्शनासाठी व्हीआयपी सशुल्क पास सुरू करण्याचा निर्णय विश्वस्त समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सदरचा पास भाविकांसाठी इच्छिक असून सोमवार (दि.१३) पासून या निर्णयांची अमंलबजावणी केली जाणार आहे.

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्त मंडळाकडून भाविकांना अधिक अधिक सेवा- सुविधा देण्याबरोबरच भगवतीचे दर्शन सुलभ होण्याकरीता व्हीआयपी पास योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी शंभर रूपयाचा पास घेऊन भाविकांना दर्शनबारीमध्ये न लागता थेट दर्शनाची मिळणार आहे. गडावर वर्षभरासह चैत्र व नवरात्रोत्सव व मंगळवार, शुक्रवार व रविवार हे तिन दिदव भाविकांची प्रचंड गर्दी असते. सदर गर्दीचे नियोजन व नियंत्रण होण्याच्या दृष्टीने विश्वस्त मंडळाने सदरचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान सदरचा व्हिआयपी पास भाविकांना ऐच्छिक असून सर्वसामान्य दर्शन व्यवस्था पूर्वीप्रमाणे तशीच उपलब्ध असेल. सशुल्क दर्शन सुविधेचा लाभ घेणाऱ्यांत दहा वर्ष वयोगटातील बालकांना मात्र निशुल्क असेल.

ग्रामस्थांना मात्र मोफत दर्शन…
सदर पास हे विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालय, उपकार्यालयात सकाळी ९ ते ६ पर्यंत भाविकांना उपलब्ध असतील. या पासच्या माध्यमातून भाविकांना श्री भगवतीचे दर्शन सुलभ होणार आहे. त्याचबरोबर सप्तशृंग गडावरील ग्रामस्थांना आधार कार्ड तपासून मोफत दर्शन सुविधा देण्यात येणार असलऱ्याची माहिती विश्वस्त संस्थेमार्फत देण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button