नाशिकहून चाळीसगावला जाणाऱ्या बसला अपघात, 40 प्रवासी जखमी | पुढारी

नाशिकहून चाळीसगावला जाणाऱ्या बसला अपघात, 40 प्रवासी जखमी

नाशिक (देवळा) पुढारी वृत्तसेवा : येथील उमराणे महामार्गावर आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास बस व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. बसमधील 40 प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील तीन प्रवाशी गंभीर जखमी असल्याने त्यांना मालेगांव येथे उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज मंगळवारी (दि. ७) सकाळी 9 वाजता मुंबई आग्रा महामार्गावरील उमराणे नजीकच्या सांगवी येथे गतिरोधक जवळ भरधाव वेगाने जाणारी नाशिक चाळीसगांव एसटी बस क्रमांक MH14BT2359 ने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने बसमधील 40 प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील 3 प्रवाशी गंभीर जखमी असल्याने त्यांना मालेगांव येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींची नावे :

जखमींमध्ये वाहन चालक जितू पवार, वाहक योगेश राठोड, प्रवासी नामदेव आहेर (शिरसाटे), विजया खाडे (नाशिक), पुरुषोत्तम खाडे (नाशिक), विजय पवार (दिंडोरी), सुभाष बोरसे (नाशिक), प्रदीप शांताराम पाटील(नाशिक), प्रशांत शिवाजी बोरसे (नाशिक) अशा हिलाल पवार (नाशिक), श्याम मधुकर विसपुते, कमल गोकुळ साळुंखे, नासिक आप्पा किसन मोरे, भालचंद्र चिंचोळे (नाशिक), विजय पवार, मंगला भालचंद्र चिंचोले (नाशिक) यांचा समावेश आहे.

यासर्व जखमींना उमराणे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उमराणे येथील जाणता राजा मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, उमराणाचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत देवरे, माजी सभापती विलास देवरे हजर  झाले.  रुग्णवाहिकेने सर्व जखमींना उपचारासाठी मालेगाव व उमराणे येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. या घटनेचा देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button