नाशिक : पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लावून देतो सांगत आठ लाखांचा गंडा | पुढारी

नाशिक : पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लावून देतो सांगत आठ लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लावून देतो, असे सांगून चार भामट्यांनी एकास आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शरद दत्तसिंग आडे (४२, रा. ता. दारवा, जि. यवतमाळ) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चौघांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली.

शरद यांच्या फिर्यादीनुसार, संशयित विनोद शेळके, देवानंद गायकवाड व इतर दोघांनी डिसेंबर २०२२ ते ३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत गंडा घातला. मुलाला नाशिकरोड पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीस लावून देतो, असे सांगून चौघांनी शरद यांच्याकडून आठ लाख रुपये घेतले. तसेच मुलाच्या नोकरीची बनावट ऑर्डर तयार करून ती शरद यांना दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शरद यांनी नाशिकरोड पोलिसांकडे फसवणुकीची फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विनोद शेळके यास अटक केली आहे.

हेही वाचा :

Back to top button