नाशिकरोडला आज आदित्य ठाकरेंची सभा | पुढारी

नाशिकरोडला आज आदित्य ठाकरेंची सभा

नाशिकरोड : शिवसेनेचे युवा नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची सोमवारी (ता. ६) सायंकाळी सहा वाजता नाशिकरोडच्या आनंदऋषीजी शाळेमागील सुवर्णा सोसायटीच्या पटांगणात जाहीर सभा होणार आहे. सहसंपर्क प्रमुख व माजी जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी ही माहिती दिली.

सभेच्या नियोजनाबाबत नाशिकरोड येथे पक्ष कार्यालयात दत्ता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी माजी महापौर नयना घोलप, माजी नगरसेविका रंजना बोराडे, मंगला आढाव, सुनीता कोठुळे, संतोष साळवे, प्रशांत दिवे आदी उपस्थित होते. सभेला माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार योगेश घोलप, सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, गटनेते विलास शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

हेही वाचा :

Back to top button