नाशिक : जिना चढताना 12 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुढारी

नाशिक : जिना चढताना 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

नाशिक : जीना चढत असताना पडल्याने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना पेठरोडवरील अश्वमेध नगर परिसरात घडली. वैशाली मोहन गोसावी असे या मुलीचे नाव आहे. वैशाली ही गुरुवारी (दि.२) रात्री साडे अकराच्या सुमारास घरातील जीना चढत असताना पडली. त्यात तिच्या चेहऱ्यास गंभीर दुखापत झाली. तिला १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांनी तपासले असता तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button