कीर्तन सुरू असतानाच मुस्लिम कीर्तनकारांनी घेतला अंतिम श्वास | पुढारी

कीर्तन सुरू असतानाच मुस्लिम कीर्तनकारांनी घेतला अंतिम श्वास

धुळे, पुढारी वृत्तसेवा: ( कीर्तनकारांनी घेतला अंतिम श्वास )

अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा,
तुका म्हणे त्याच्या सुखा पार नाही…

हा संत तुकारामांचा अभंग निजधामाचे आणि गोडवे गातो. वारकरी संप्रदायात या निजधामाचे म्हणजे अंतिम क्षणाचे हे वर्णन पांडुरंगाच्या स्मरणात होणे हे भाग्याचे मानले जाते. अशीच काहींशी भावपूर्ण घटना कीर्तन सुरू असतानाच साक्री तालुक्यात हभप ताजुद्दीन महाराज यांच्याबाबत घडली. कीर्तनात रंगले असतानाच त्यांनी अंतिम श्वास घेतला.

साक्री तालुक्यातील जावदे या गावी ही धक्कादायक आणि ह्रदयद्रावक घटना घडली. कीर्तन सुरू असतानाच ताजुद्दीन महाराज यांना ह्रदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

ज्ञानेश्वरी पारायणाच्या समाप्तीचे किर्तन करीत असतांना अचानक ते खाली बसले. यानंतर काही क्षणातच ते सहकारी कीर्तनकाराच्या मांडीवर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार करण्यापुर्वीची त्यांची प्राणज्योत मालवली. औरंगाबाद जिल्हयातील त्यांच्या मूळगावी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निजामपूर नजीक असलेल्या जामदे गावात ज्ञानेश्वर पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सोमवारी रात्री वारकरी सांप्रदायाचे गाढे अभ्यासक हभप ताजोददीन शेख यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या किर्तनाला सुरुवात झाली.

किर्तनकार शेख यांनी ज्ञानेश्वरीमधील एका अभंगावर निरुपण केले. यावेळी टाळ मृदुगाचा गजर सुरु होता.

कीर्तन अखेरच्या टप्प्यात आले असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते खाली बसले.

यानंतर काही क्षणातच ते सहकारी किर्तनकाराच्या मांडीवर कलंडले. त्याचवेळी कीर्तनकारांनी घेतला अंतिम श्वास घेतला.  सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले. पण त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

कीर्तन सुरु असतांना अचानक हभप शेख हे मंचावर कोसळल्यानंतर सहकाऱ्यांनी हरीनामाचा गजर सुरू ठेवला.

तर ग्रामस्थांना ही बाब समजल्यानंतर शोककळा पसरली.

संत विचारांचा प्रसार

हभप ताजोदीन महाराज यांनी आयुष्यभर वारकरी व संत साहित्याचा प्रचार व प्रसार करण्याचे काम केले.

महाराष्ट्रासह गुजराथ, कर्नाटक व मध्यप्रदशे तसेच गोवा राज्यात महाराजांनी आपली कीर्तनसेवा दिली होती.

या भागांमधे त्यांना माननारा वर्ग मोठा आहे. ते उत्तम गायनाचार्य होते. संस्कृत व संत साहित्यावर त्यांचा गाढा अभ्यास होता.

औरंगाबाद जिल्हयात त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने वारकरी संप्रदायातून शोक व्यक्त केला जातो आहे.

हेही वाचा : 

Back to top button