जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी विद्या गायकवाड कायम ; ‘मॅट’कोर्टाने दिला निकाल | पुढारी

जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी विद्या गायकवाड कायम ; ‘मॅट’कोर्टाने दिला निकाल

जळगाव : जळगाव महापालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड यांची बदली केल्यानंतर त्यांनी मॅट मध्ये धाव घेतली होती. मॅटने हा निकाल विद्या गायकवाड यांच्या बाजूने दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आयुक्तपदी विद्या गायकवाडच राहणार असल्याचे निश्चीत झाले आहे.

जळगाव महापालिक आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची अचानक बदली करून परभणी येथील देवीदास पवार यांची निुयक्तीचे आदेश काढण्यात आले होते. या कालावधीत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड प्रशासकीय प्रशिक्षणासाठी पुणे येथे गेल्या होत्या. त्यामुळे एकतर्फी पदभार घेतल्याचा त्यांचा दावा केला होता. तर दुसरीकडे देवीदास पवार यांनी महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार देखील घेतला होता. अवघ्या सात महिन्यात आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्याने डॉ. विद्या गायकवाड यांनी लवाद अर्थात मॅट न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, डॉ. विद्या गायकवाड यांच्या अर्जावर दोन ते तीन वेळा सुनावणी झाली होती. न्यायालयाने त्यांचा निकाल राखून ठेवला होता. त्यानुसार मंगळवारी ३१ जानेवारी रोजी मॅटने डॉ. विद्या गायकवाड यांच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे आता महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड ह्याच कारभार संभाळणार असल्याचे निश्चित झाले आहे.

हेही वाचा :

Back to top button