नाशिक : खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून अजमेर दर्ग्यावर चादर अर्पण | पुढारी

नाशिक : खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून अजमेर दर्ग्यावर चादर अर्पण

जुने नाशिक: पुढारी वृत्तसेवा
अजमेर येथील सर्वधर्मीय श्रद्धास्थान हजरत  ख्वाजा गरीब नवाज यांचा ८११ वा उर्स अर्थात बडी छट्टी शरीफ रविवार, दि. २९ जानेवरी रोजी साजरी झाली. यानिमित्ताने नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून नेहमीप्रमाणे अजमेरला चादर शरीफ पाठविण्यात आली. बाळासाहेबांची शिवसेना नाशिक अल्पसंख्यांक सेलचे कार्याध्यक्ष काशिफ पिरजादे यांनी दर्ग्यावर हजेरी देत हि चादर दर्ग्यावर अर्पण केली. यावेळी विकार  शेख, फरहान सैय्यद, जाकीर कुरेशी, तौसिफ तांबोळी, अशरफ सैय्यद, अनस पटेल, रजा शेख, आरिफ शेख, मिराज शेख, राझीक शेख, हमजा शेख, जफर सैय्यद, तौसिफ़ शेख उपस्थित होते. दर्ग्यावर फातेहा पठण करीत देशाची प्रगती व्हावी, शांतता नांदावी, एकात्मता व सलोखा अबाधित कायम राहावा यासाठी प्रार्थना करण्यात आली.

हेही वाचा:

Back to top button