Metro…In Dino रिलीज डेटची घोषणा; सारासोबत आदित्यचा दिसणार ऑनस्क्रीन रोमान्स | पुढारी

Metro…In Dino रिलीज डेटची घोषणा; सारासोबत आदित्यचा दिसणार ऑनस्क्रीन रोमान्स

पुढारी ऑनवलाईन डेस्क : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग बसू यांनी २०२२ मध्ये त्याच्या आगामी ‘मेट्रो… इन दिनों’ (Metro…In Dino ) प्रोजेक्टची घोषणा केली होती. या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) दोघेजण पहिल्यांदाच ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार असून, या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श याच्या ट्वि‍टर अकांऊटवर आगामी ‘मेट्रो… इन दिनों’ ( Metro…In Dino ) चित्रपची रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. यात ‘मेट्रो… इन दिनों’ चित्रपट ८ डिसेंबर २०२३ रोजी रिलीज होणार असल्याची माहिती आहे. आदित्य कपूर आणि साराशिवाय या चित्रपटात अभिनेता अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, अली फजल आणि फातिम सना शेख या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शक अनुराग बसू याच्यांसोबत चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांनी केली आहे. या चित्रपटातून सारा आणि आदित्य पहिल्यांदाच ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहेत.

याआधी अनुराग बसूने २००७ साली ‘लाइफ इन मेट्रो’ चित्रपट बनवला होता. या चित्रपटावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. ‘लाइफ इन मेट्रो’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र, नफिसा अली, शिल्पा शेट्टी, केके मेनन, शायनी आहुजा, कोंकणा सेनशर्मा, कंगना राणावत, शर्मन जोशी आणि इरफान खान हे कलाकार दिसले होते.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

Back to top button