नाशिक : शहरात अनधिकृत नळजोडणीविरोधात कारवाई; करवसुली विभागाकडून सहा दिवसांत 76 जोडण्या बंद | पुढारी

नाशिक : शहरात अनधिकृत नळजोडणीविरोधात कारवाई; करवसुली विभागाकडून सहा दिवसांत 76 जोडण्या बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
करवसुली विभागाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने शहरातील अनधिकृत नळजोडणीविरोधात कारवाई सुरू केली असून, 1 ते 6 जानेवारी 2023 दरम्यानच्या सहा दिवसांत 76 नळजोडण्या बंद केल्या असून, 29,69,48 रुपयांची वसुली केली आहे. एकूण 241 ठिकाणी मनपाच्या पथकाने पाहणी केली. त्यातील 156 ठिकाणी वसुली करण्यात आली आहे. 57,96,471 रुपयांपैकी 29,69,48 रुपयांची वसुली झाली आहे. नागरिकांनी कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन कर विभागाच्या उपआयुक्त अर्चना तांबे यांनी केले आहे.

नाशिक पश्चिम:
बंद केलेल्या नळजोडण्या – 81
वसुली केलेली नळजोडणी संख्या – 81
थकबाकी रक्कम – 11,95,000
वसुली रक्कम – 10,31,419

सातपूर
बंद केलेल्या नळजोडण्या – 32
वसुली केलेल्या नळजोडणी संख्या – 28
थकबाकी रक्कम – 15,62,260
वसुली रक्कम – 5,33,906

नाशिकरोड
बंद केलेल्या नळजोडणी – 8
वसुली केलेली नळजोडणी संख्या – 6
थकबाकी रक्कम – 6,46,928
वसुली रक्कम – 58,990

नाशिक पूर्व
बंद केलेल्या जोडण्या – 8
वसुली केलेली जोडणी संख्या – 8
थकबाकी रक्कम – 11,27,726
वसुली रक्कम – 4,108,29

पंचवटी
बंद केलेली नळजोडणी – 0
वसुली केलेली नळजोडणी संख्या – 19
थकबाकी रक्कम – 3,32,998
वसुली रक्कम – 2,32,662

नवीन नाशिक
बंद केलेल्या नळजोडण्या – 28
वसुली केलेली नळजोडणी संख्या – 14
थकबाकी रक्कम – 9,31,559
वसुली रक्कम – 7,01,242

मालमत्ता वॉरंट
सातपूर -14
नाशिक पश्चिम -3
नाशिक पूर्व -4
नवीन नाशिक – 26
एकूण – 47

कारवाईची स्थिती
एकूण वसूल केलेली नळजोडणी संख्या – 156
एकूण नळजोडणी बंद केलेली संख्या – 76
एकूण थकबाकी रक्कम – 57,96,471
एकूण वसूल केलेली रक्कम- 29,69,048

47 मिळकतधारकांना वॉरंट
मनपाच्या कर विभागाने सहा
दिवसांमध्ये सहा विभाग मिळून एकूण 47 वॉरंट काढले आहेत. त्यातून 11,84,486 रुपयांची वसुली झाली आहे. वॉरंट बजावल्यानंतर 21 दिवसांच्या आत मिळकतधारकांनी थकबाकीचा भरणा करणे अनिवार्य आहे. अन्यथा चालू बाजारभावाप्रमाणे मिळकतीचे मूल्यांकन करून लिलाव प्रक्रिया सुरू केली जाईल, असा इशारा मनपाच्या कर विभागाने दिला आहे.

विभागनिहाय मालमत्ता वॉरंट संख्या
सातपूर -14
नाशिक पश्चिम -3
नाशिक पूर्व -4
नवीन नाशिक – 26
एकूण – 47

हेही वाचा:

Back to top button