नाशिक : अन् पाडसाच्या मदतीला शेतकरी आला धावून | पुढारी

नाशिक : अन् पाडसाच्या मदतीला शेतकरी आला धावून

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा

नांदगाव तालुक्यातील मळगाव येथे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाच्या पाडसाला शेतकऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाने जीवनदान मिळाले आहे.

मळगाव येथील प्रकाश आहेर यांच्या गट क्रमांक २७१ मधील क्षेत्रात उसाची लागवड केलेली असून, पिकाची तोडणी सध्या सुरू आहे. या परिसरात हरणांचे मोठे वास्तव्य असून, आपल्या क्षेत्रातील ऊस तोडणी सुरू असलेल्या क्षेत्रात येथील शेतकरी प्रकाश आहेर हे फेरफटका मारायला गेल्यानंतर तेथे हरणाच्या कळपावर कुत्र्यांनी हल्ला चढविला होता. हरणाचे पाडस या हल्ल्यात जखमी झाले होते. ही बाब आहेर यांच्या लक्षात येताच त्यांनी डॉक्टर रत्नाकर आहेर यांना याबाबत माहिती देत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्याची विनंती केली.

डॉक्टर रत्नाकर पवार यांनी वनविभागाला माहिती देत पाडसावर प्रथमोपचार केले. पुढील उपचारासाठी त्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. वनविभागाचे अधिकारी सुरेंद्र जगताप, विकास बोडखे, भुजबळ, सुरेश शिरसाट, कैलास शिंदे आदींनी जखमी पाडसाला नांदगावला पुढील उपचारासाठी नेले आहे.

हेही वाचा :

Back to top button