Nashik : दिंडोरी तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार; सदाशिव गावितांसह शिवसैनिक शिंदे गटात | पुढारी

Nashik : दिंडोरी तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार; सदाशिव गावितांसह शिवसैनिक शिंदे गटात

दिंडोरी पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील (जि.नाशिक) काही आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य व कार्यकर्त्यांनी   शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे , जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, यांच्या मार्गदर्शनाखाली दिडोरी तालुका प्रमुख किशोर कदम, सुरगाणा तालुका प्रमुख हरीभाऊ भोये यांच्या उपस्थितीत यांच्या शिंदे गटात प्रवेश केला.

जिल्हा परिषद अहिवंतवाडी गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ रोहिणी शामकुमार गावीत यांचे सासरे सदाशिव गावीत यांच्या सोबत देवसाने ग्राम पंचायतीचे उपसरपंच जालिंदर गायकवाड, चौसाळे ग्रामपंचायतीचे सदस्य सुदाम तुंगार, कार्यकर्ते रमेश झिरवाळ, भगवान झिरवाळ, आदिवासी विकास संस्थेचे चेअरमन नारायण तुगार, देवपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भाऊराव महाले, माजी सदस्य तुकाराम महाले, दीपक बेजेकर, जोपुळच्या सरपंच चंद्रकला भाऊसाहेब जाधव, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी बोंबले, हेमंत गायकवाड, सचिन जाधव, जानोरी येथील सोमनाथ वतार,आंबादास फसाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button