नाशिकमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार ; आराेपीला २० वर्षे सक्तमजुरी | पुढारी

नाशिकमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार ; आराेपीला २० वर्षे सक्तमजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश मृदुला भाटीया यांनी मंगळवारी (दि.१३) २० वर्षांची सक्तमजुरी व 20 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. संताेष टिळे (28, रा. पळसे, नाशिकरोड) असे आराेपीचे नाव आहे.

एप्रिल २०१७ मध्ये पीडिता दुपारी एकटीच घरी असताना संतोषने तिच्यावर अत्याचार केला. दुसऱ्या तरुणाशी असलेले संबंध उघड करण्याची धमकी देत संताेषने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडितेवर वारंवार अत्याचार केले. या अत्याचाराचे व्हिडिओ व अर्धनग्न फाेटाे इतरांना दाखवण्याची व इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार सुरूच ठेवले. अत्याचार असहाय झालेल्या पीडितेने धाव घेत नाशिकराेड पाेलिसांत संतोषविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर या प्रकरणी बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम व माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाला हाेता. तत्कालीन वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी तपास करून आराेपीविरुद्ध दाेषाराेप दाखल केले हाेते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश भाटीया यांनी साक्ष, फिर्याद व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे संताेषला दाेषी ठरवत शिक्षा ठाेठावली. सरकारी वकील म्हणून ॲड. दीपशिखा भिडे यांनी काम पाहिले.

हेही वाचा :

Back to top button