Nashik : देवळा येथे ‘हेल्मेट जनजागृती मोहीम’ | पुढारी

Nashik : देवळा येथे 'हेल्मेट जनजागृती मोहीम'

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा : देवळा येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मालेगाव तर्फे “हेल्मेट जनजागृती मोहीम” राबविण्यात आली. वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन मालेगांव येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनाद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा येथील मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.१२) रोजी देवळा शहरात हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालून देवळा शहरातील मुख्य रस्त्यावर रॅलीद्वारे जनतेचे लक्ष वेधले. या महिन्यात हेल्मेट वापरा यासंदर्भात जनजागृती करण्यात येणार असून, येत्या १ जानेवारी पासून विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येेेेेेेेेणार आहे.

सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येकाने हेल्मेट वापरणे बंधनकारक असल्याचे मोटार वाहन निरीक्षक सचिन बोधले यांनी सांगितले. यावेळी अनेक दुचाकी स्वारांनी रॅलीत आपला सहभाग नोंदवला. या कायक्रमासाठी मोटार वाहन निरीक्षक सचिन बोधले, जाऊद शेख, सुवर्णा देवरे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी देवळा मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक दिनेश सुर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

हेही वाचा :

Back to top button