Nashik Crime : मनमाडला दोघा तरुणांकडून 24 तलवारी जप्त, पोलिसांची मोठी कारवाई

24 तलवारी जप्त,www.pudhari.news
24 तलवारी जप्त,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा 

मनमाड शहरात छुप्या पद्धतीने तलवार विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कारवाई करत मनमाड पोलिसांनी दोघा तरुणांकडून तब्बल 24 तलवारी जप्त केल्या आहेत.

चरणसिंग भुपिंदरसिंग आणि बाळासाहेब पवार अशी या या दोघा तरुणांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे.  त्यांच्याकडून 24 तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शहरातील गुरुद्वाराजवळ असलेल्या एका दुकानात तलवार विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.

या दोघा संशयितांविरोधात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे तलवारी कुठून आल्या व कुणासाठी आणल्या यासंदर्भात पोलिस अधिक तपास करीत असल्याची माहिती डिवायएसपी समीरसिंग साळवे यांनी दिली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news