हुमा कुरेशीचा किलर लूक | पुढारी

हुमा कुरेशीचा किलर लूक

पुढारी ऑनलाईन : हुमा कुरेशी पुन्हा तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. हुमा जेव्हाही पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्याकडे बघत राहतात.

आतापर्यंतच्या कारकिर्दीत तिने अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. यामुळेच एकीकडे चाहते तिला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत, तर दुसरीकडे अभिनेत्रीला सतत मोठे प्रोजेक्टस् मिळत आहेत. यामुळे हुमा रोज कोणत्या ना कोणत्या हमाचा कारणाने नेहमीच किलर लूक चर्चेत असते. हुमा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही सक्रिय असते. आता तिच्या फोटोशूटमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

नवीन फोटोंमध्ये अभिनेत्रीचा एथनिक लूक पाहायला मिळत आहे. फोटोत हुमाने प्रिंटेड साडी आणि ब्लून स्लीव्हजसह डीप नेक ब्लाऊज घातला होता. यासह तिने आपले केस खुले ठेवले आहेत. सध्या तिला अनेक प्रोजेक्टस् सातत्याने मिळत आहेत. अलीकडेच ती ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’मध्ये दिसली होती. सध्या ही अभिनेत्री ‘तरला’ आणि ‘पूजा मेरी जान’मध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Huma Qureshi (@iamhumaq)

Back to top button