नाशिक : सहा तालुक्यांत महिलाराज; पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत जाहीर | पुढारी

नाशिक : सहा तालुक्यांत महिलाराज; पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हाधिकारी कार्यालयात पंचायत समिती सभापतिपदांच्या आरक्षणाच्या काढण्यात आलेल्या सोडतीत जिल्ह्यातील सहा तालुक्यांत महिलाराज असणार आहे. सभापतिपदाच्या १५ जागांसाठी सहा जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. निफाड व नांदगाव या दोन तालुक्यांतील पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असून, उर्वरित १३ तालुक्यांमध्ये मात्र आरक्षण निघाले आहे.

ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील पंचायत समित्यांबाबत सध्या लागू असलेल्या आरक्षण समाप्तीनंतर येणाऱ्या दिवसापासून पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त व भटक्या जमातीसह) तसेच महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग) सभापतिपदांची संख्या राखीव ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतिपदे निश्चित करण्यासाठी मंगळवारी (दि.६) सकाळी ११ वाजता नियोजन भवनात उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) नितीन गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली.

Back to top button