‘खान्देश रन’ : जैन इरिगेशनचे 1000 हून अधिक सहकाऱ्यांची दौड | पुढारी

'खान्देश रन' : जैन इरिगेशनचे 1000 हून अधिक सहकाऱ्यांची दौड

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगाव रनर्स ग्रुप आयोजित ‘खान्देश रन’ महोत्सवामध्ये जैन इरिगेशनचे तब्बल 1000 हून अधिक सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. हजारो धावपटूंमधून 10 कि.मी. पुरुष गटात जैन इरिगेशनमधील सुरक्षा विभागातील सहकारी महेंद्र राजपूत तृतीय क्रमांकाने विजेता ठरला. तसेच वयस्क वयोगटात टाकरखेडा येथील सुरक्षा विभागातील सहकारी भीमराव अवताडे यांनी 10 कि.मी.मध्ये द्वितीय क्रमांक मिळवत विजेते ठरले आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना खा. उन्मेष पाटील, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, विष्णू भंगाळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॉफी, सन्मानचिन्ह यासह पाच हजारांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, राजेश चोरडिया यांनी 21 कि.मी. मॅरेथॉन रनला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. यानंतर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, महापौर जयश्री महाजन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डी. डी. बच्छाव, मनोज शिंदे, मनोज अडवाणी यांच्यासह मान्यवरांनी प्रत्येक मॅरेथॉन रनच्या धावपटूंचा उत्साह वाढविला. तसेच जैन परिवारातील अभेद्य जैन, अभंग जैन, अन्मन जैन यांनी प्रत्यक्ष खान्देश रनमध्ये सहभाग घेतला.

हेही वाचा:

Back to top button