Accident : सिन्नर शिर्डी महामार्गावर भीषण अपघात ; दोन ठार | पुढारी

Accident : सिन्नर शिर्डी महामार्गावर भीषण अपघात ; दोन ठार

नाशिक : (वावी) पुढारी वृत्तसेवा
सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय  महामार्गावर देवपूर फाट्याजवळ बुधवारी (दि.30) सकाळी 7.30 च्या सुमारास शिर्डीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणार्‍या मुंबई येथील साईभक्तांच्या तवेरा जीपला अपघात (Accident) झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जीप उलटून झालेल्या अपघातात भाईंदर व अंबरनाथ येथील दोघांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

कल्याण व भाईंदर परिसरातील एकमेकांचे नातेवाईक व मित्र असणारे तरुण मंगळवारी (दि. 29) साई दर्शनासाठी शिर्डी येथे मुक्कामी थांबले होते. बुधवारी सकाळी त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जायचे असल्याने ते सिन्नरकडे जात असताना सकाळी साडेसातच्या सुमारास देवपूर फाट्याजवळ तवेरा जीप (एमएच 04 क्यूझेड 9228) उलटून अपघात झाला. वेगात असलेली जीप टायर फुटल्याने जवळपास दोनशे फूट फरफटत गेली.

या अपघातात (Accident) इंद्रदेव दया शंकर मोरया (25, रा. लोढा पार्कजवळ, भाईंदर पूर्व) व सत्येंद्र सुखराज यादव (21, रा. बुवापाडा, अंबरनाथ) या दोघांचा गंभीर जखमी झाल्याने अपघातस्थळीच मृत्यू झाला. तर त्रिवेंद्र त्रिपाठी व रोहित मोरया या दोघांना गंभीर दुखापत झाल्याने नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. इतर पाच तरुण किरकोळ जखमी झाले. सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या सुपूर्त करण्यात आले. अपघात घडल्यानंतर वावीचे सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक प्रकाश गवळी, विजय सोनवणे, हवालदार सतीश बैरागी, नितीन जगताप, क्रेनचालक किरण पाटील आदींनी अपघातस्थळी धाव घेतली. स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढण्यात आले. तर जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button