नाशिक : राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करा; माकपची मागणी | पुढारी

नाशिक : राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करा; माकपची मागणी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वक्तव्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व सीटुच्या वतीने निषेध करण्यात आला.  सिडको खुटवडनगर परिसरातील  सिटुभवन जवळ निदर्शने आंदोलन करून राज्यपालांची ताबडतोब हकलपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली.

१५ डिसेंबरपर्यंत कोश्यारींची हकालपट्टी न केल्यास दोनशे ठिकाणी निदर्शने, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट चले जाव मोर्चा काढण्याचा व नासिक जिल्ह्यातून १ लाख स्वाक्ष-या  राष्ट्रपतींना पाठविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या आंदोलन प्रसंगी सिटु चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, जिल्हा अध्यक्ष  सिताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस  देविदास आडोळे, तुकाराम सोनजे, सचिन मालेगावकर,  मोहन जाधव,  संजय पवार,  सतीश खैरनार,  आत्माराम डावरे,  कल्पना शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

हेही वाचा :

Back to top button