नाशिक : महाराष्ट्र- उत्तराखंड गुंतवणूक करार; महाराष्ट्र चेंबर, सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा पुढाकार | पुढारी

नाशिक : महाराष्ट्र- उत्तराखंड गुंतवणूक करार; महाराष्ट्र चेंबर, सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा पुढाकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर व उत्तराखंड येथील सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्यात गुंतवणुकीसाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कौतुक केले असून, या करारामुळे दोन्ही राज्यांच्या व्यापार, उद्योगांच्या विकासासाठी सकारात्मक पाऊल टाकल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उत्तराखंडचे उद्योगमंत्री चंदन राम दास यांनी सांगितले की, उत्तराखंडमध्ये व्यापार, उद्योगांसाठी पोषक वातावरण असून, दोन्ही राज्यांतील उद्योगांच्या गरजेनुसार गुंतवणुकीसाठी सर्वोत्तपरी सहकार्य केले जाईल. तर चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी, ‘सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनसमवेत सामंजस्य करारामुळे दोन्ही राज्यांतील व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्रातील उत्पादनांची आयात-निर्यात करणे, दोन्ही राज्यांत गुंतवणूक वाढविण्यासाठी संयुक्त उपक्रम राबविणे, माहितीची देवाण-घेवाण करण्यात येणार आहे. या सामंजस्य करारामुळे दोन्ही राज्यांचा विकास होण्यास मदत होईल.’ सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हरिंद्र कुमार गर्ग यांनी उत्तराखंडमध्ये व्यापार, उद्योगांच्या संधींबाबत माहिती दिली. तसेच व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्रासाठी उत्तराखंडमध्ये गुंतवणूक करण्यास सकारात्मक वातावरण असल्याचे सांगितले. याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, महिला उद्योजकता समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील, पर्यटन समितीचे चेअरमन संतोष तावडे, इंटरनॅशनल रिलेशन्स कमिटीचे चेअरमन मनप्रीत नेगी, टॅक्सेशन कमिटीचे चेअरमन उदय गोडबोले, इंटर्नल ट्रेड कमिटीचे चेअरमन प्रदीप मांजरेकर, ट्रेड असोसिएशन कमिटीचे चेअरमन धैर्यशील पाटील, सागर नागरे व उत्तराखंडमधील उद्योजक जगदीश लाल पहावा, डॉ. मोहिंदर आहुजा, रणजीत जालान, सुयश वालिया, राकेश कुमार त्यागी, जतीन अग्रवाल, सुरेश बोरा, सुभाष शर्मा, अनिल कुमार, शैलेश अजमेरा, कुणाल दाढीया, विमलकुमार सिंग, खुबिलाल राठोड आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button