पाहा या बुद्धिमान व्यक्तीने 'बँक स्लीप' कशी भरली? नक्कीच पोट धरून हसाल! | पुढारी

पाहा या बुद्धिमान व्यक्तीने 'बँक स्लीप' कशी भरली? नक्कीच पोट धरून हसाल!

पुढारी ऑनलाइन डेस्क : सोशल मीडियावर अनेक मजेशीर गोष्टी सतत व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठा शेअर होत आहे. ज्यामुळे लोकांना त्यांचे हसू आवरणे अशक्य झाले आहे. एका बुद्धिमान व्यक्तीने बँकेत गेल्यावर पैसे भरण्याची डिपॉजीट स्लीप भरताना तपशीलात जे दिले आहे, ते वाचून अनेकांना हसू फूटत आहे.

बँकेत पैसे भरण्याची पावती भरताना इंग्रजी आणि हिंदी तसेच स्थानिक भाषांमध्ये पावत्या आपण भरू शकतो. इथे इंडियन बँकेची पैसे भरल्याची पावती या फोटोमध्ये दिसत आहे. त्यामध्ये तपशीलात सर्व प्रथम नाव नंतर मोबाइल नंबर झाल्यावर ‘रकम’ अर्थात तुम्ही किती पैसे भरत आहात याची माहिती अक्षरी आणि अंकात भरावयाची असते. इंग्रजीतील Amount या शब्दाला आपल्याकडे प्रमाण भाषेत धनराशी किंवा ‘राशि’ असे म्हटले जाते. मात्र, राशी किंवा राशि हा शब्द ज्योतिषशास्त्रात देखिल वापरला जातो. तिथे राशी म्हणजे आकाशात तयार होणा-या तारकाकृतींसाठीचा शब्द ज्याच्यावरून भविष्य दर्शवले जाते. म्हणून प्रयोग केला जातो.

तर या बुद्धिमान व्यक्तीने बँक पावती भरताना रकमेच्या जागी आपली राशि म्हणजे तुला राशि असे लिहिले आहे. तसेच पुढे त्याने अंकात आणि अक्षरात देखिल रकमेची नोंद केली आहे. तसे तर ही पावती 12 एप्रिल 2022 ची आहे. हा फोटो 16 एप्रिल 2022 ला ट्विटर यूजर @NationFirst78 ने शेअर केला होता. मात्र, आता तो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.

फोटो व्हायरल झाल्यानंतर यावर ट्विटर तसेच अन्य सोशल मीडियाच्या फ्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात कमेंट केले जात आहेत. एकाने त्यावर म्हटले आहे की कदाचित तुला राशीतील व्यक्ति असे प्रकार करत असतात असे लिहिले आहे.

पावती भरणा-या व्यक्तीने हे हेतू परस्पर गंमत म्हणून केले का खरचं चूक झाली हे समजायला मार्ग नाही. मात्र, या घटनेतून व्यावहारिक शिक्षणाचा लोकांमध्ये किती अभाव आहे. तसेच व्यावहारिक शिक्षण द्यायला हवे, याची प्रचिती येत आहे.

हे ही  वाचा :

कोहलीच्या पाकिस्तानविरुद्ध खेळीला आयसीसीचा सलाम

नाशिकमध्ये गोवर आजाराचा शिरकाव नाही

दोन हजार वर्षांपूर्वीचा खंजीर नऊ महिन्यांत झाला स्वच्छ!

Back to top button