नाशिक : पंढरपूर-घुमान सायकलवारीचे हरिनामाच्या जयघोषात स्वागत | पुढारी

नाशिक : पंढरपूर-घुमान सायकलवारीचे हरिनामाच्या जयघोषात स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

संत नामदेव जयंतीनिमित्त ४ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या पंढरपूर ते पंजाबमधील घुमान रथयात्रा व सायकलवारीचे मंगळवारी (दि.८) नाशकात आगमन झाले. याप्रसंगी नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजीव तुपसाखरे व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी संत नामदेव तसेच हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदंगाच्या निनादाने परिसर दुमदुमला होता.

तिडके कॉलनीतील तुपसाखरे लॉन्सवर झालेल्या कार्यक्रमात सूर्यकांत भिसे, मनोज मांढरे, सायकलिस्ट असोसिएशनचे आबा पाटील, जगन्नाथ पवार, प्राचार्य के. आर. शिंपी, अतुल मानकर, रवींद्र राहणे, संजय नेवासकर आदी मान्यवर व्यासपीठावर होते. यानंतर सायकलवारी त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठमार्गे घुमानकडे मार्गस्थ झाली.

अशी आहे सायकलवारी…

– भागवतधर्म प्रसारक संघ, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव समाजोन्नती परिषद व नामदेव दरबार कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रथयात्रा व सायकलवारी 2,300 किलोमीटरची आहे.

– समारोप 28 नोव्हेंबरला चंदिगड येथे राजभवनात पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

– दररोज 100 कि. मी.चा प्रवास करीत गुजरात, राजस्थान, हरियाणामार्गे रथयात्रा व सायकलवारी 26 नोव्हेंबरला घुमान(पंजाब)येथे मुक्कामी पोहोचेल.

– सायकलवारीत 50 पेक्षा अधिक वयोमान असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे 110 सायकल सायकलपटू सहभागी झाले आहेत.

हेही वाचा:

Back to top button