नाशिक : जुलूस-ए-गौसियाची तयारी अंतिम टप्प्यात | पुढारी

नाशिक : जुलूस-ए-गौसियाची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिक (जुने नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
इस्लाम धर्मातील ज्येष्ठ धर्मगुरू हजरत गौसे-ए-आजम दस्तगीर यांची ग्यारहवीं शरीफ निमित्त जुने नाशिकमध्ये सालाबादप्रमाणे जुलूस-ए-गौसियाची मिरवणूक सोमवारी (दि.7) जहांगीर मशीद चौक मंडई येथून निघणार असून, याची तयारी अंतिम टप्प्यात दाखल झाली आहे. रविवार सायंकाळपासून इस्लामी कालगणनेनुसार तारीख बदलताच मशिदी व दर्ग्यामध्ये सामूहिक फातेहा पठण, मेहफिल-ए-नातो मंकबतचे आयोजन व घरामध्ये गोड पदार्थ तयार करून त्यावर फातेहा पठण करण्यात येणार आहे.

जुने नाशिकमध्ये सर्वधर्मीय श्रद्धास्थान असलेल्या बडी दर्गाह शरीफसह परिसरातील मशिदी व दर्ग्यावर विद्युत रोषणाई सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सजावट करण्यात आली आहे. चौक मंडई, बागवानपुरा व दूधबाजारातील झेंडे, पताके, अत्तर, टोपी, रुमाल, सुरमा, साफा (इस्लामी फेटा), गुलाब पाणीसह इतर साहित्य खरेदीसाठी मुस्लीम बांधवांची गर्दी झाली. डीजेचा वापर टाळण्याचे आवाहन ग्यारहवीं शरीफनिमित्त खडकाळी परिसरात खडकाली मस्जिद ट्रस्ट, नाशिक यांच्या वतीने ‘फरमान-ए-गौसे आजम’ शीर्षक असलेला एक रंगीत डिजिटल फलक लावण्यात आला आहे. मिरवणुकीत सामील होताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

हेही वाचा:

Back to top button