'या' मंदिरातील गुहेत अजस्र अजगर बाबांचे वास्‍तव्य; भाविकांमध्ये प्रचंड आस्‍था | पुढारी

'या' मंदिरातील गुहेत अजस्र अजगर बाबांचे वास्‍तव्य; भाविकांमध्ये प्रचंड आस्‍था

सागर : मध्य प्रदेशातील सागर स्थित बागराज मंदिरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये स्थानिक भाविक अजगराची पूजा करत असल्याचे दिसत आहे. हा अजगर अ‍ॅनाकोंडापेक्षाही मोठा असून मंदिरातील गुहांमध्ये हा अजगर अनेक दशकांपासून वास्तव्य करत आहे. हा अजगर कधी कधी प्रकट होतो. तो प्रकट झाल्यानंतर मंदिरात भाविकांकडून मंत्रोच्चार केले जातात.

अजगर बाबा या नावाने ओळखला जाणारा हा अजस्र अजगर मंदिर परिसरातील गुहांमध्ये काही दिवसांपूर्वी दिसला होता, असा दावा भाविकांनी केला आहे. त्यावेळी भाविकांना त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. भाविक या अजगरला घाबरत नव्हते, हे विशेष. हा अजगर 40 फुटांपेक्षा अधिक लांब असून त्याच्या उपस्थितीत हरसिद्धी मातेचे भाविक पूजा करतात. हा अजगर पूर्ण पाहायला मिळाला नाही; मात्र भाविकांमध्ये त्याच्याबद्दल प्रचंड अस्था आहे.

लोक या अजगरला एका ऋषीचा पुनर्जन्म मानतात, असे एका वृद्धाने सांगितले. अजगर बाबा चिडखोर नाही तर तो शांत स्वभावाचा असून तो मंदिराचा रक्षक असून आपण त्याची अनेक दशकांपासून पूजा करत असल्याचे पुजार्‍याने सांगितले. मंदिर परिसरात 10 फूट लांबीचे कोब्रा सापडतात. या सापांनी कधीच मंदिरात येणार्‍या-जाणार्‍यांना त्रास दिला नसल्याचेही पुजार्‍याने सांगितले.

Back to top button