नाशिक : घ्या… “चुलीतले निखारे” कवितासंग्रहासोबतच ‘शब्द-सूर संवाद’ चा आस्वाद | पुढारी

नाशिक : घ्या... "चुलीतले निखारे" कवितासंग्रहासोबतच 'शब्द-सूर संवाद' चा आस्वाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा न्यायालयातील लघुलेखक कवी जगदीश देवरे यांच्या इंडिया दर्पण मीडिया हाऊस “चुलीतले निखारे” या कविता संग्रहाचे प्रकाशन सायंकाळी रविवारी (दि. ६) वाजता ५.३० सावानाच्या ग्रंथालयभूषण मु. शं. औरंगाबादकर येथे आयोजित करण्यात आले आहे.

नाशिकचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी, जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) आर. एस. करंकाळ, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष आणि मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, कवी देवीदास चौधरी, डॉ. डी. एम. गुजराथी, डॉ. प्रताप गुजराथी (मनमाड) आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. तसेच सोर्स म्युझिक स्टुडिओचे संगीतकार-गायक संजय गिते हे कवी देवरे यांच्या निवडक रचनांवर आधारित ‘शब्द-सूर संवाद’ हा कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार असून कवी रवींद्र मालुंजकर हे सूत्रसंचालन करणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जगदीश देवरे व परिवाराने केले आहे.

हेही वाचा:

Back to top button