गतवर्षी कपाशीला १३ हजारांपर्यंत भाव मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर कपाशीची पेरणी केली. त्यात परतीच्या पावसाने काही ठिकाणी कापसाचे मोठे नुकसान झाले, असे असले तरी कपाशीचे यंदा चांगले उत्पादन येत आहे. कापसाचा दर्जाही चांगला आहे. यामुळेच जिनिंग प्रेसिंग असोसिएशनने यंदा २५ ते ३० लाख कापसाच्या गाठी निर्मितीचे उत्पादन घेण्याचे ठरविले आहे. यामुळेच ३० लाख गाठींचे उत्पादन घेण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, परतीच्या पावसाने कपाशीत आर्द्रता निर्माण झाल्याने कपाशीचे भाव कमी झाले आहेत. सध्या सात ते साडेआठ हजारांचा दर कपाशीला भाव मिळत आहे.