राष्ट्रीय एकता दिन: पंचायत समिती नांदगाव येथे राष्ट्रीय एकात्मता दौड उत्साहात

नाशिक (नांदगाव): सचिन बैरागी
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव पंचायत समिती मार्फत राष्ट्रीय एकात्मता दौडचे आयोजन करण्यात आल्याने नागरिकांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदवला.
गंगाधरी ग्रामपंचायत कार्यालय ते पंचायत समिती नांदगावपर्यंत राष्ट्रीय एकात्मता दौड आयोजित करण्यात आली. त्यानुसार गटविकास आधिकारी गणेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती नांदगावचे कर्मचारी व गंगाधरी येथील ग्रामस्थांनी देखील यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. पंचायत समिती नांदगाव कार्यालय येथे या दौडची सांगता झाली. गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिली. तसेच एकता दिनाचे महत्त्व व पार्श्वभूमी त्यांनी विशद केली. त्याचबरोबर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम ही साजरा करण्यात आला. याचबरोबर तालुक्यातील विविध शाळांमध्ये व ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रीय एकात्मता दौड व शपथेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाल्याने मोठ्या उत्साहात तालुक्यात कार्यक्रम झाल्याचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी सांगितले.
हेही वाचा :
- Imran Khan : इम्रान खान यांच्या रॅलीत महिला पत्रकाराचा चिरडून मृत्यू (Video)
- राष्ट्रीय एकता दिन : सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार देशाच्या एकतेला पुरक – प्राचार्य डॉ. काळे
- नांदेड : पांडुरंग चुट्टेवाड यांच्या निधनानंतर देहदान; कुटुंबियांनी केला संकल्प पूर्ण