Nashik Accident : अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव कारने उडविले | पुढारी

Nashik Accident : अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव कारने उडविले

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

सिटी लिंक बस वाहकाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या दहा ते बारा जणांना भरधाव कारने धडक दिल्याची घटना शनिवार (दि.29) भद्रकाली परिसरातील जुने नाशिक शितळादेवी मंदिर अमरधाम येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

सिटीलिंक बस वाहक मकरंद पंचाक्षरी याचा मृत्यू झाल्याने सिटीलिंक कर्मचारी पंचाक्षरी यांच्या अंत्यविधीसाठी अमरधाम येथे आलेले होते. अशातच पंचवटी अमरधामकडून नानावलीकडे जाणारी कार रस्त्यावर उभ्या असलेल्या काहीजणांच्या घोळक्यावर जाऊन धडकली. ही घटना रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. कार इतकी भरधाव होती की, यात रस्त्यावर उभे असलेले दहा जण तर कारचालकासह कारमध्ये बसलेले पाचजण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान  कारचालक मद्यधुंद होता असे सांगण्यात येत असून या अपघातात जखमी झालेल्यांपैकी दहा जण हे सिटीलिंक कर्मचारी असल्याचे समजते.

हेही वाचा :

Back to top button