नाशिक : नोकरीच्या आमिषाने पाच जणांना घातला 54 लाखांचा गंडा | पुढारी

नाशिक : नोकरीच्या आमिषाने पाच जणांना घातला 54 लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत पाच जणांना तब्बल 54 लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे संशयित त्रिकुटाने स्वत:च्या मुलीला नोकरी लागली असून, लाखो रुपये दिल्यास तुमचेही काम होईल, असे सांगत तरुणांचा विश्वास संपादन केला. या प्रकरणी अंबड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित त्रिकूट पसार झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित भावसिंग साळुंके, पत्नी मनीषा साळुंके आणि मुलगी श्रुतिका साळुंके या त्रिकुटाने खासगी सेवेत असलेल्यांसह शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना रेल्वे भरतीची कोणतीही परीक्षा न देता ‘टीसी’ म्हणून नियुक्तीचा दावा केला. मार्च महिन्यांत बनावट भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यावर 18 मार्च ते 19 ऑक्टोबर या कालावधीत संशयितांनी स्वप्निल राजेंद्र विसपुतेकडून 5 लाख, सोनाली पाटीलकडून 13 लाख 70 हजार, पंकज अर्जुन पवारकडून 15 लाख, मनीषा विनोद सुरवाडेकडून 10 लाख तर शिवाजी नाना मगळकरकडून 11 लाख रुपये वेळोवेळी उकळले.

बेरोजगार तरुणांना rrberesulets, indianrrcboard, in या तीन बनावट संकेतस्थळांचा वापर करून बनावट निकालासहित नियुक्तिपत्रे दिली. तत्पूर्वी जयपूरमध्ये वैद्यकीय चाचणी केल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यापैकी काहीजण नियुक्तीच्या ठिकाणी गेल्यावर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा :

Back to top button